Friday, March 2, 2018

वामुमावि माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी - वार्षिक धूलिवंदन - खुली भेट संभाजी पार्क कट्टा - वर्ष अकरावे - दिनांक २ मार्च २०१८

वामुमावि माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी -
वार्षिक धूलिवंदन - खुली भेट
संभाजी पार्क कट्टा - वर्ष अकरावे - दिनांक २ मार्च २०१८
-----------------------------------------------------------------
दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही संभाजी पार्क कट्ट्यावर (महानगर गॅस समोरील भागात ) जमलो आणि विविध वर्षाच्या माजी विद्यार्थी मित्रा बरोबर धुलीवंदनाच्या आनंद रंग खेळून लुटला
रविंद्र भोसले ( १९७७ ), प्रमोद राणे,सुनील बोरकर, सारंग दाणी, पराग ओक, दीपक करकरे, कुलदीप मोतीवाले, हेमंत आठवले, संदीप केदारी, आशिष शांडिल्य ( सर्व १९८२) त्या शिवाय हेमंत देवस्थळी (१९८३) स्वामी प्रसाद जोशी आणि शेखर लिखिते ( १९८५) तसेच संदीप बदादे आदी शाळकरी मित्र जमले होते, श्री विश्वास पाठक ( १९७७) आणि योगेश देशमुख ( १९८२) ह्यांनी फोन वरून जमलेल्या सर्वाना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
२००७ साली आम्ही जे १९८२ च्या शाळकरी वर्ग मित्र मैत्रिणी यांनी जे आमच्या शालांत वर्षाच्या रौप्यमहोत्सवी भेट कार्यक्रम केला होता त्याचा आयोजनाचा भाग म्हणून मुलुंड पूर्वेला विविध सोसायटीज आणि भागात जाऊन धूलिवंदन शुभेच्छा दिल्या होत्या.
अगदी गेले सात वर्षे अव्याहत पणे हा फेसबुक ग्रुप प्रवाही राहिला तो .............. केवळ तुमच्या आमच्या सारख्या शाळकरी मित्र मैत्रिणी मुळे..................
धुली वंदन भेटी नंतर अगदी १९९९ च्या बॅच चे शाळकरी मित्र भेटले आणि प्रसन्न वाटले
स्टे कनेक्टेड
भेटत राहू
आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणी साठीचा ग्रुप
आणि
कुठल्याही जाहिराती, चेन मार्केटिंग, प्रमोशन्स तसेच राजकारण - समाजकारण शिवाय
केवळ निखळ शाळकरी मैत्री जपण्यासाठी ......................................
wamumavisyearlymeet.blogspot.in ( For Non FB users - only updates not wall )आमचे शालेय वर्षात माझ्या आठवणी प्रमाणे इयत्ता सातवी प्रयन्त म्हणजे १९७९ पर्यंत फाउंटन पेन होते आणि शाळेच्या बेंच वर पुढच्या मागच्यांना शाई लावून होळी - धूलिवंदन साजरे व्हायचे मग १९८० नंतर बॉल पेन नी हि गंमत हि हिरावून घेतली. वय वाढत गेले शाळा सुटली पाटी फुटली ........................ जगभरातील विविध मार्गावर आणि विविध भागात गेलेल्या सर्वाना जमवून रौप्यमहोत्सवी रियुनियन साजरे केले तेव्हा लक्षात आले कि दरवर्षी भेटलेला हवे मग हीच इच्छा हिरीरीने मंडळी दिवंगत श्री नितीन मुंढे यांनी पण .......................
मग मे २००७ नंतर लगेच २००८ च्या प्रजासत्ताक दिनी संभाजी पार्क वर आणि त्या नंतर शारदा निलायम संकुलात तर २००८ पासून दरवर्षी आम्ही संभाजी पार्क कट्ट्यावर धुलिवंदनाला भेट हा उपक्रम चालू केला सुरवातीला ब्लॉग वर अपडेट्स अपलोड करायचो अजूनही फेसबुक वर नसलेल्या साठी ब्लॉग अपडेट करतो पण खरी गंमत आणली हि १५ मार्च २०११ च्या दिवसांनी ...............
अगदी गेले सात वर्षे अव्याहत पणे हा फेसबुक ग्रुप प्रवाही राहिला तो .............. केवळ तुमच्या आमच्या सारख्या शाळकरी मित्र मैत्रिणी मुळे..................
धुली वंदन भेटी नंतर अगदी १९९९ च्या बॅच चे शाळकरी मित्र भेटले आणि प्रसन्न वाटले
स्टे कनेक्टेड
भेटत राहू
फक्त
आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणी साठीचा ग्रुप
आणि
कुठल्याही जाहिराती, चेन मार्केटिंग, प्रमोशन्स तसेच राजकारण - समाजकारण शिवाय
केवळ निखळ शाळकरी मैत्री जपण्यासाठी ......................................
( ताजा कलम : वामुमावि च्या शालेय विद्यार्थी मित्र मैत्रिणी व्यतिरिक्त शाळेतील आजी माजी शिक्षक, संस्था कर्मचारी आणि संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांना ह्या ग्रुप वर सामावून घेतले आहे पण इतर सर्वाना ग्रुप मध्ये सामावून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू नयेत कारण त्या नंतर ते सारे प्रमोशन्स, जाहिराती, संस्थेचे / संस्थांचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण ह्यात वाहून जाते.
इतर शाळेचा अथवा शाळांचा उल्लेख अथवा अपूर्ण माहितीची फेसबुक प्रोफाईल्स तसेच जाहिरात वाली प्रोफाईल्स ह्यांना ग्रुप मध्ये सामावून घेत नाही
फेसबुक ग्रुप वर येणारे लिखाण तसेच कोंमेन्टस हे ऍडमिन ग्रुप तर्फे सर्वसाधारण पणे मॉनिटर / बघून अँप्रूव्ह केले जातात पण लिखाणाचा सर्व जबाबदारी हि फक्त पोस्ट कर्त्यांची आहे आणि ऍडमिन त्यास जबाबदार नाही
कुठलीही वर्गणी, देणगी तसेच सभासद मूल्य  फेसबुक लादत नाही तो पर्यंत घेत नाही / घेणार नाही आणि देत नाही / देणार नाही.
१५ मार्च २०११ ह्या फेसबुक ग्रुप स्थापना दिवसा निम्मित शालेय मित्र मैत्रिणीच्या नातेवाईक, हितचिंतक आणि पालक ह्यांना बघण्या साठी ग्रुप केवळ वर्षातून पंधरा दिवस १५ मार्च ते  ३१ मार्च मध्ये  क्लोस्ड ऐवजी ओपन ठेवण्यात येईल पण केवळ शाळकरी मित्र मैत्रिणी शिवाय अन्य कोणाच्या मेम्बरशिप रिक्वेस्ट अथवा पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत.
ग्रुप चा शाळेच्या संस्थेशी तसेच अन्य कुठल्या संस्था राजकारण, समाजकारण, अर्थकारण तसेच चेन मार्केटिंग, जाहिराती आदींशी संबंध नाही आणि त्याचा उल्लेख असलेला पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत
केवळ शाळेच्या काळातील निखळ मैत्री जपण्यासाठी !

https://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/


wamumavisyearlymeet.blogspot.in ------- For non FB users - only updates 


Saturday, January 27, 2018

२६ जानेवारीच्या शाळा भेटी बद्दल............

२६ जानेवारीच्या शाळा भेटी बद्दल............

आम्ही १९८२ चे बॅचमेट्स नी आमच्या बॅच चे शाळा सोडून २५ वर्षे झाली म्हणून २००७ साली रियूनियन करायचे ठरवले अगदी जेवढे जमतील तेवढे सगळ्यांना मग काय तयारी सुरु झाली फोन इमेल एस एम एस आणि मागील पुढील वर्षांचे सहकारी ( चाचणी - सहामाही परीक्षेत बेंच शेअरिंग मंडळी ( अडले पडले तर तोंडी कॉपी मदत ) ...... हा हा हा ) ह्यांच्या मदतीने साधारण प्रत्येक तुकडीच्या ५० गुणिले तीन म्हणजे १५० जणांचा शोध सुरु झाला अगदी जगाच्या कुठल्याही काना कोपऱ्यात गेले असतील तरी शोध २००५ ते २००७ सुरु होता ................... जवळ जवळ १५० पैकी १३० जणांशी संपर्क साधला गेला ( जवळ जवळ १० जण शाळा सोडल्या पासून स्वर्गवासी झाले होते ) ८२ जणांनी यायचे निश्चित केले आणि ७३ जण आले मग यथावकाश दिवसभराचा कार्यक्रम ४ मे २००७ ला पार पडला अख्या दिवसाचा बँक्वेट हॉल आणि देश विदेशातून आलेले बॅचमेट्स तर एक दोघांनी त्याच काळात मोबाईल वरून संपर्क साधला मग त्या सर्व कार्यक्रम पुन्हा नव्याने ओळख , खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम ह्याचे व्हिडीओ चित्रण करून सी डी दिली गेली आणि थोडे दिवसांनी ते रियूनियन आजतागायत युट्युब व्हिडीओ म्हणून नेट वर पण आहे ....................असो

झाले काय रियूनियन्स विविध ठिकाणी होतात अगदी ह्या आधी ही झाली आहेत आणि पुढे ही होत राहतील पण हे सर्व करतांना पुढच्या मागच्या बॅच च्या लोकांनी सुचवले कि आपण पब्लिक प्लेस - सार्वजनिक ठिकाणी वर्षातुन एकदा भेटत जाऊया मग २६ जानेवारी २००८ ला आम्ही खूप सारे विविध वर्षांचे / बॅच चे शाळकरी मित्र- मैत्रिणी संभाजी पार्क वर जमलो पण तिथून २००९ सालापासून २६ जानेवारीला शाळेत आणि धूली वंदनाच्या दिवशी संभाजी पार्क वर भेटू लागलो ते आजतागायत अगदी काही वर्षी उपस्थिती रोडावली तर काही वेळा काही परदेशात असलेले बॅचमेट्स मुद्दाम ह्या दिवशी येऊन भेटून गेले.

मी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याने कुठल्याही दिवशी सुट्टी नसते अगदी आठवड्याची म्हणजे कॅलेंडर विकली ऑफ अथवा रोस्टर ऑफ हा प्रकार माझ्या नोकरीत नाही असो . पण त्या मुळे माझे वर्किंग शेड्युल अगदी नक्की झाले आणि मी मेसेज अपलोड केले

मी, प्रमोद राणे, अतुल माळी / समुग्धा माळी तसेच हेमंत देवस्थळी आणि १९८३ चे बॅचमेट्स ( फेसबुक ग्रुप वर फोटो पोस्ट आहे ) हे २६ जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनास शारदा निलायम परिसरात उपस्थित होतो. कार्यक्रम नंतर शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांना नमस्कार करून निघालो.

२००८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या शाळकरी मित्र मैत्रिणींच्या भेटीचा संभाजी पार्क वरील ग्रुप फोटो आपणा सर्वांच्या साठी पुन्हा एकदा इथे ब्लॉग पेज चा भाग म्हणून इथे अपलोड करत आहे.

फेसबुक ग्रुप   https://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/
प्रचलीत झाल्या पासून ब्लॉग थोडा मागे पडला असला तरी पण जुने सर्व फोटो आहेत तेव्हा आपणास शक्य झाल्यास ब्लॉग पाहावा.

http://wamumavisyearlymeet.blogspot.in