Thursday, November 3, 2011

भेटूया का ? २६ जानेवारी २०१२ गुरवार रोजी सकाळी आठ च्या पुढे ! शारदा नीलायम येथे !

माझ्या  वा. मु. मा. वि. शाळेच्या  १९७५ पासूनच्या विविध वर्षांच्या माजी विद्यार्थी - माजी  विद्यार्थीनीनो !

आपण दरवर्षी २६ जानेवारी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्यासाठी जमत असतो. आणि  गेली चार - पाच वर्षे विविध वर्षातील  माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनी याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

इस २०१२ मधील २६ जानेवारी, गुरवारी येत आहे. आधीचा अनुभव असा आहे  २६ जानेवारी, शनिवार / रविवार अथवा अन्य सुट्टीला जोडून आली तर  प्रतिसाद चांगला नसतो. पण ह्या वर्षी आपण फेसबुक माध्यमातून जोडले गेले आहोत आणि ग्रुप सभासद संख्या साधारतः ५०० च्या घरात / जवळपास  आहे.

वर्षाकालीन कालिदास स्मरण दिनी आणि गेल्या २६ जानेवारीला सर्वांनी वाढता प्रतिसाद दिला होता आणि यंदाही म्हणजे  २६ जानेवारी २०१२ , गुरवारी तो मिळेल अशी खात्री आहे.

साधारण नियोजित  रूपरेषा अशी

सकाळी ८ वाजता शारदा नीलायम येथील शालेय झेंडा वंदनाला उपस्थित राहणे.

सकाळी ९ वाजता त्या नंतर शालेय परिसरातील महाविद्यालय, 
जिमखाना परिसराची ओळख करून घेऊन, मागील बाजूस म्हणजे शालेय व्यायाम कक्षा मागे / अल्पोपहार केंद्राच्या मागील बाजूस एकत्र जमणे.  एकमेकाची ओळख, शाळेच्या विद्यमान कार्यकारणीच्या सभासद ( माजी विद्यार्थ्यांपैकी ) यांचे मनोगत - अनुभव - अपेक्षा  यांचा समन्वय साधणे.

बरोबरच सर्वाना आवडेल - रुचेल असा एखादा खेळ म्हणजे शाळेच्या मैदानाला प्रत्येक वर्ष - दोन वर्षाच्या उपसमूहावार  शाळेच्या आवारात नाहीतर जवळील संभाजी पार्क जॉगिंग पाथ वर " जलद चालणे स्पर्धा " ठेवणे.

अल्पोपहार - चहापान

माफक वैयक्तिक खर्च - निधी जमवणे - जर खर्च सर्वांवर पडलाच तर !

नोंद असावी :

भेट ह्या कार्यक्रमात कुठलाही मार्केटिंग, चेन मार्केटिंग, राजकीय वा सामाजिक संघटना जोडणी वा प्रचार कार्यक्रम नसेल आणि नसावा हि विनंती.

सर्व इच्छुक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी आप - आपल्या जबाबदारीवर सार्वजनीक ठिकाण भेट ह्या सदरात वा प्रकारात भेट घेतील अशी खात्री आहे.
-------------------------------------------

आपण मुलुंड / महामुंबई बाहेरील परिसरात वास्तव्याला असाल तर वेळेत आपला  वर्ग मित्र - मैत्रिणीच्या अथवा जुने शाळा सोबती यांच्या सहकार्याने उपस्थित राहायचे ठरवू शकाल का ?

-------------------------------------------

आपल्या ब्लॉग / इ - मेल / फेसबुक वरील प्रतिसादा प्रमाणे कार्यक्रम नक्की करता येईल
आणि संस्था कार्यकारिणी सदस्यांशी समन्वय साधता येईल.
----------------------------------------------------


भेटूया का ?  
२६ जानेवारी २०१२ गुरवार रोजी सकाळी आठ च्या पुढे ! 
शारदा नीलायम येथे ! 

Monday, July 4, 2011

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रम

वा. मु. मा. वि. च्या माजी विद्यार्थी / विद्यार्थिनीनो,

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा,
महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रम हा आपण सर्वांनी सहभाग घेतलात म्हणून संपन्न झाला.

हेमंत बापट १९९०
विवेक अमोणकर १९९०
सरिता जोशी १९९०
शीतल चव्हाण ( शिंदे) १९९०
रेवती बापट ( भिडे ) १९९०
सुलक्षणा तांबोळी ( सन्याल) १९९०
मनीष कुलकर्णी १९९०
मंदार पाटणकर १९८८
सचिन अकुडे १९९२
प्रवीण काळे १९९२
वैभव वाघमारे १९९२
सचिन सावंत १९९२
सानिका कुलकर्णी १९९२

नयना माडीवाले १९९०
योगेश कुलकर्णी १९९२
किरण देशमुख १९७८
अमूल पतंगे १९७८
रविंद्र भोसले १९७६
विश्वास फाटक १९७६
विक्रम राजपूत १९९०
अश्विन भोईर १९९०
निलेश लोणकर १९९०
अभय गुरव १९९०
संतोष थोरात १९९०
संदीप कदम १९८९
ललित मालवणकर १९९०
निलेश वाणी १९८८
विशाल गायकवाड १९९०
वंदना प्रधान १९७८
वंदना कारंडे शिंदे १९८८
प्रमोद राणे १९८२
रविंद्र गांगल १९८२ 
माधव कळमकर १९७६ 

संध्याकाळी साधारणतः पाच नंतर संभाजी पार्क कट्ट्यावर संभाजी राजे भोसले सभागृहाच्या कॉर्नर जवळ सर्व माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी भेट हा कार्यक्रम झाला. उपस्थित सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतली. १९७६ च्या विश्वास फाटक आणि रविंद्र भोसले यांची सर्व उपस्थितांना सर्वात वरिष्ठ म्हणून माहिती करून देण्यात आली.

२००८ च्या प्रजासत्ताक दिनापासून, प्रजासत्ताक दिनी " शारदा नीलायम" संकुलात आणि धुळवडीच्या म्हणजे होळी सेकंड डे, अर्थात सुट्टीच्या दिवशी दरवर्षी माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी एकमेकांना नित्यनेमाने भेटत आहेत.

पण आता फेसबुक समूह निर्मिती नंतर प्रथमच, "वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन" चे आयोजन करण्यात आले.

वर्षा सहल आयोजनाविषयी सर्वच वर्षातील आयोजन हे जर कोणी पुढाकार घेऊन करत असेल तर त्यांनी फेसबुक वरील समूहावर आवाहन करावे आणि आयोजन करावे असे ठरले.

रक्त गट नोंदणी विषयक नोंद पुस्तिका अर्थात ओंन लाईन डोकुमेंत करण्याचे ठरले व हे पोस्ट टाकताना त्याची निर्मिती करण्यात आली, त्या मधील संपर्क क्रमांक, आय डी आपआपल्या जबाबदारी वर द्यावेत हि विनंती.

सर्वच उपस्थितांनी, एकमेकाशी संवाद साधत स्वसहभागाने, अल्पोपहार कांदा भजी आणि चहा यांचा आस्वाद घेतला. 

ह्या आयोजनात श्री विजय काळे १९७६ आणि श्री प्रमोद राणे १९८२, यांचे विशेष सहकार्य लाभले.

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, 
महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रमाची काही छाया चित्रे येथे देत आहे तरी आणखीन छायचित्रे उपस्थितांपैकी लोड केली तर अधिक रंगत येईल.





http://www.facebook.com/home.php?sk=group_190571124315364

Sunday, May 22, 2011

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

वा. मु. मा. वि. च्या सर्व नेट वरील मित्र मैत्रीणीनो !

आम्ही १९८२ चे माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी एकंदर ७२ जण दिनांक ६ मे २००७ रोजी एकत्र जमल्यावर अथवा जमताना असे लक्षात आले कि केवळ एकाच वर्षाचे आणि सर्व तुकड्यांचे वा वर्गांचे नव्हे तर इतर वर्षांचे माजी विद्यार्थी एकमेकांना निदान वर्षातून एकदा भेटू इच्छितात म्हणून आम्ही २००८ पासून दरवर्षी २६ जानेवारी आणि धुलीवंदन असे दिवस ठरवले आणि नेहमी भेटण्यासाठी आवाहन करत होतो.

गेल्या पाच वर्षातील दळणवळण क्षेत्रातील क्रांतीने सर्वच जण अधिकच जोडले गेले आणि आता वर्ष १९९२ च्या माजी विद्यार्थिनी सानिका कुलकर्णी यांनी सुचवल्या प्रमाणे एक वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे आयोजीत होण्याविषयी आपली मते जाणून घेत आहे.

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे, हि पूर्ण व्यक्तिगणिक स्वखर्चावर असेल, संभाजी पार्क कट्ट्यावर जमल्यावर जमवलेल्या निधीतून अल्पोपहार आणि चहा मागवण्याचे ठरवण्यात येईल.

वर्षाकालीन सायंकाळ भेट ह्या कार्यक्रमात कुठलाही मार्केटिंग, चेन मार्केटिंग, राजकीय वा सामाजिक संघटना जोडणी वा प्रचार कार्यक्रम नसेल आणि नसावा हि विनंती.

सर्व इच्छुक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी आप - आपल्या जबाबदारीवर सार्वजनीक ठिकाण भेट ह्या सदरात वा प्रकारात भेट घेतील अशी खात्री आहे.

तेह्वा भेटूया का ?

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

Friday, May 6, 2011

सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आज अक्षय तृतीया,

पिकलेल्या हापूस आंब्याची अवीट गोडी घेण्याचा मुहूर्त !

सोने, चांदी आणि स्थावर मालमत्ता खरेदी मुहूर्त !

आपल्या शाळेच्या काळात सुट्टीचे १५ - २० दिवस निघून जाऊन पुन्हा आपल्या मित्रांचे आणि मैत्रिणींची आठवण यायला सुरवात होणारा काळ !

आजही त्या आठवणी ताज्या आहेत आणि असतात पण काळाच्या ओघात आणि धकाधकीच्या आयुष्यात विसराला होणाऱ्या आठवणी जणू ताज्या होतात ते केवळ ह्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे !

अगदी १९७५ पासूनच्या सुनील गोगटे पासून सर्व दरवर्षी होणाऱ्या वर्षातील दोन भेटींना येत राहिले आणि आता फेसबुक ग्रुपवर तर शैलेश कामत ( १९७८), प्रसाद जोशी ( १९९०) आणि मंदार पाटणकर (१९८८) आदींनी जगभरातून " फक्त वामुमावि च्या १९७५ पासूनच्या माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनीसाठी" ग्रुप साठी मित्र - मैत्रिणी जोडले.

विसरू नका ! १९७५ पासून दरवर्षी निदान ५० जण तरी संगणक जाणारे अथवा दरवर्षीच्या संख्येपैकी ३० जण तरी इंटरनेट शी जोडले असतील तेह्वा "१००१" सदस्य संख्या होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अनेक जणही वैयक्तिकरित्या अनेक वर्गमित्रांना आणि वर्गमैत्रीणीना जोडत आहेत,जोडत राहतील अशी खात्री आहे.

तेव्हा आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

Saturday, April 30, 2011

सांत्वन भेट


सांत्वन भेट

कै. दिगंबर भी. कुलकर्णी यांचे दिनांक २६ एप्रिल २०११, मुलुंड पूर्व येथे रोजी सकाळी निधन झाले.

शोकाकुल कुलकर्णी परिवारास भेट देऊन श्रीमती इंदिरा दि. कुलकर्णी (आय. डी. के. म्याडम), डॉ. उपेंद्र कुलकर्णी आणि कुलकर्णी परिवारचे सांत्वना साठी वर्ष १९८२ चे शालेय मित्र, १ मे २०११, रविवार रोजी सकाळी १०.१५ वाजता प्रसाद अपार्टमेंट, चाफेकर बंधू मार्ग ( नवघर - मिठाघर लिंक) मुलुंड पूर्व येथे जमतील.

आपण सर्वच शालेय मित्र - मैत्रिणी पैकी ज्यांना शक्य होईल त्यांना कळवण्याचे करावे.

Tuesday, April 26, 2011

दुखद: निधन : श्री. दिगंबर भी. कुलकर्णी


दु:खद निधन

कळविण्यास अत्यंत दु:ख होते कि, मुलुंड पूर्वमधील अग्रगण्य सामाजिक आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. दिगंबर भी. कुलकर्णी यांचे आज दिनांक २६ एप्रिल २०११, मुलुंड पूर्व येथे रोजी सकाळी निधन झाले.

कैलासवासी, श्री. दिगंबर भी. कुलकर्णी , हे वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयाच्या एक माजी मुख्याध्यापिका श्रीमती. इंदिरा कुलकर्णी ( आय. डि. के. म्याडम ) याचे पती, तसेच वर्ष १९८२ चा माजी विद्यार्थी, डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांचे वडील होते.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो

Tuesday, April 19, 2011

धूली वंदन भेट २०११ ची आणखी काही छायाचित्रे - सौजन्य - सुनील बोरकर - वर्ष १९८२



धूली वंदन भेट २०११ ची आणखी काही छायाचित्रे 

सौजन्य - सुनील बोरकर - वर्ष १९८२

Click the Link over here 


Monday, April 11, 2011

हार्दिक अभिनंदन !


हार्दिक अभिनंदन !
वा.  मु. मा. वि.  च्या  वर्ष १९८० मधील शाळकरी माजी विद्यार्थी, 
ख्यातनाम कला दिग्दर्शक 
श्री. नितीन चंद्रकांत देसाई 
यांचे 
आर्ट डिरेक्शन गिल्ड हॉलिवुडलॉस एंजल्स 
या संस्थेचे सदस्यत्व सन्मानाने आणि कर्तबगारीने मिळवल्याबद्दल विशेष हार्दिक अभिनंदन !

खालील लिंक क्लिक करा !

Friday, April 1, 2011

होळी - धूली वंदन - २० मार्च २०११ - छायाचित्रे

होळी - धूली वंदन - २० मार्च २०११ - छायाचित्रे 

सौजन्य : पराग ओंक ( वर्ष १९८२ )


फोटो ची लिंक खालील प्रमाणे, पाहण्यासाठी क्लिक करा येथे

Monday, March 21, 2011

Check the correction Regarding Reunion of AC YR 1977 - 78 ( 1978 Pass Out)

Dear All,

Please Check the correction Regarding Reunion  of  AC YR 1977 - 78 ( 1978 Pass Out)

2011/3/21 Vijay Kale 

Dear Ravi,

Sorry I was not able to join you on 20.03.2011 for HOLI.

While going thru' your mail, I read about message by Kiran Deshmukh.
Yes, we are arranging a re-union. Thanks for spreading the message.
However, there are some corrections in message by Kiran Deshmukh.

Original message is as under:
 
1. Batch of 1977-1978 (Passouts 1978)
2. Date of Reunion is 17.04.2011
3. Contact Details --> Kiran Deshmukh (9820184682)/ Vijay Kale (8108066249) 

Regards,

Vijay Kale (1978 batch)

NOTE: Please communicate this to all.

Sunday, March 20, 2011

इसवी. २०११ - वा. मु. मा. वि. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी - धूली वंदन वार्षिक भेट

इसवी. २०११ - वा. मु. मा. वि.
 माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी 
 धूली वंदन वार्षिक  भेट 

दिनांक २० मार्च २०११ रोजी सकाळी १० नंतर खालील 
माजी विद्यार्थी धूली वंदन वार्षिक भेट मध्ये सामील झाले.

१) श्री माधव कळमकर  वर्ष १९७६
२) श्री विश्वास फाटक     वर्ष १९७६
३) श्री निलेश धोपटकर वर्ष  १९८८
४) श्री मंदार पाटणकर वर्ष १९८८
५) श्री मनोज शांडिल्य वर्ष १९८०
६)  श्री आशिष शांडिल्य वर्ष १९८२
७) श्री योगेश वैशंपायन वर्ष १९८२
८) श्री सुनील बोरकर वर्ष १९८२
९) श्री पराग ओंक वर्ष १९८२
१०) श्री प्रसाद घरत  वर्ष १९८२
११) श्री अतुल कुलकर्णी  वर्ष  १९८२
१२) श्री रविंद्र गांगल  वर्ष १९८२
१३) श्री सारंग दाणी वर्ष १९८२ 
१४) श्री संदीप दौंड  वर्ष १९७८
१५) श्री मनोज दौंड वर्ष १९८१


सर्वांनी एकमेकांना रंग लावल्या वर शालेय जीवनाबद्दल आणि शाळकरी मित्र - मैत्रिणीबद्दल गप्पा मारल्या.

वर्ष १९७७ च्या  वा. मु. मा. वि. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी  पुनर्भेट कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०११ रोजी शारदा नीलायम परिसरात होणार आहे असे श्री किरण देशमुख यांनी कळवले होते.

आपणास परिचित १९७७ च्या माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनीना 
श्री किरण देशमुख यांचेशी १० एप्रिल २०११ पूर्वी  
संपर्क साधण्यास कळवावे हि विनंती !


वर्ष १९८८ च्या माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी प्रस्तावित पुनर्भेट कार्यक्रमासाठी संपर्क अभियान श्री मंदार पाटणकर, श्री निलेश धोपटकर, श्री महेश केंदुरकर आदींनी सुरु केले आहे. 

आपणास परिचित १९८८  च्या माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनीना श्री मंदार पाटणकर, श्री निलेश धोपटकर, श्री महेश केंदुरकर आदींशी  यांचेशी संपर्क साधण्यास कळवावे हि विनंती !


गेली पाच वर्ष माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी वर्षातून दोनदा एकमेकांना भेटत असतात त्या निम्मिताने सर्व जुन्या शाळकरी मित्रांची माहिती आणि पुनः ओळख होते. अश्या वेळेस काही रचनात्मक उपक्रम राबवावा असा  विचार मांडला गेला आहे. तेह्वा सद्य स्थित विविध उपक्रम करणाऱ्या संस्था मुलुंड मध्ये आहेत त्या व्यतिरिक्त 

वेगळे काय करता येईल हे सुचवावे  अशी सर्वाना विनंती.

सायकल फेरी, वृक्षरोपण, विविध संस्थाची, उपक्रमांची आणि विविध ठिकाणी मिळू शकणाऱ्या सोयी - सवलतीची माहिती देणे - घेणे अश्या काही सूचना आल्या आहेत तेह्वा आपले मत, सूचना, विचार आणि आपल्या सहभागाची तयारी  इ - मेल द्वारे कळवावी म्हणजे पुढील वार्षिक भेट दिनांक २६ जानेवारी २०१२ रोजी मूर्त स्वरूपात साकारता येईल.

पुढील वर्षी कार्यक्रम जोरदार आणि पूर्वीच्या माजी विद्यार्थी संघ सारखा करावा असे ठरले.

शाळेच्या व्यवस्थापन समितीत सध्या ११ पैकी ९ सदस्य माजी विद्यार्थी आहेत तेह्वा सर्व ती मदत घेता व देता येईल.

टीप: वर्ष १९७५ पासूनच्या आता पर्यंत सर्व वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थिनीच्या भेटी, समूह सभा, सहली, पाल्यांची वा माजी विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थिनीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक यश, समूह छाया चित्रे, तसेच क्षेम - कुशल आपण कळविल्यास आपल्या  ब्लॉग वर वा फेसबुक ग्रुप वर  देता येईल.
दरवर्षी २६ जानेवारी आणि होळी च्या दुसरे दिवशी सर्वच वर्षीचे म्हणजे १९७५ पासूनचे हौशी माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी नवीन शाळा संकुल परिसरात आणि संभाजी पार्क परिसरात  एकत्र येतात हे विसरू नये !

 इसवी. २०११ - वा. मु. मा. वि. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी - धूली वंदन भेट  कार्यक्रमाची छाया - चित्रे  लवकरच देण्याचा प्रयन्त करण्यात येईल.

Saturday, February 26, 2011

वा.मु.मा.वी. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी = धूली वंदन वार्षिक भेट ! दिनांक २० मार्च २०११, रविवार


वा.मु.मा.वी. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी = धूली वंदन वार्षिक भेट !

सालाहाबाद प्रमाणे यंदाही म्हणजे दिनांक २० मार्च २०११, रविवार  रोजी सकाळी १० च्या सुमारास आम्ही,  वा.मु.मा.वी. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी = धूली वंदन निमित्ताने संभाजी पार्क कट्टा, महानगर गैस समोर भेटणार आहोत.

शालेय जीवनात, एकमेकाच्या अंगावर शाई अथवा पाणी उडवून होळी च्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र - मैत्रिणीच्या बरोबर होळी खेळला असालच !

ह्या आधीच्या धूली वंदनाचे  फोटो ब्लॉग वर आहेत !

आता खुल्या कट्ट्या वर शाळा संपून अनेक वर्षांनी परत एकदा रंग खेळण्यास भेटा !

Wednesday, January 26, 2011

वामुझ ! प्रजासत्ताक दिन २०११ ! माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी - भेट वृतांत !


वामुझ !  प्रजासत्ताक दिन  २०११  !  माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी - भेट वृतांत !

गेले चार वर्षे, म्हणजे आमच्या १९८२ च्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी रौप्य महोस्तव भेटी नंतर ( दिनांक ७ मे २००७ ) ...................



विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी संपर्काने असे ठरवण्यात आले की वर्षातून दोन दिवस सार्वजनिक ठिकाणी म्हणजे संभाजी पार्क कट्टा येथे भेटण्याचे करावे त्या साठी २६ जानेवारी आणि होळी दुसरा दिवस ठरवण्यात आला. 

२००८ साली आम्ही संभाजी पार्क कट्ट्या वर भेटलो त्याचे छायाचित्र 


२००९ च्या २६ जानेवारीला असे ठरले की माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी - भेट कार्यक्रम शाळेत म्हणजे शारदानिलायाम ह्या शाळेच्या संकुलात घेण्यात यावा आणि त्या प्रमाणे झाले.

पहा आणि ऐका !
http://wwwhttp://www.youtube.com/watch?v=&feature=player_इम्बेद्देद

भेटी विषयी इतर माहिती आणि सामील झालेल्यांची नावे खालील ब्लॉग वर देण्यात आली आहेत.

सर्व माहिती साठी वेळ काढून ब्लॉग पूर्णपणे पाहावा आणि  मूवी क्लिप्स पहाव्यात / ऐकाव्यात !

२६ जानेवारी २०११ च्या बाबत वृत्त 

साधारणता: सकाळी साडे नऊ नंतर एकंदर वीस माजी विद्याथी आणि माजी विद्यार्थांनीनी शाळेच्या शारदा नीलायम संकुलात उपस्थित झाले. शाळेच्या व्यवस्थापन समिती पैकी श्री आशुतोष साळवेकर, किरण देशमुख आणि श्री. दीपक जोशी यांनी सर्वांच स्वागत केले.

श्री आशुतोष साळवेकर यांनी जिमखाना / जिमन्याशीयम बद्दल माहिती दिली. संध्याकाळी  पाच ते आठ वाजे पर्यंत माजी  विद्याथी आणि माजी विद्यार्थांनीनी ह्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

शाळेच्या जुनिअर कॉलेज बद्दल आणि इतर प्रशासनिक माहिती काही जनांनी आस्थेने विचारली, 

सर्व माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनीची ओळख आणि संक्षिप्त माहित कार्यक्रम झाला, शाळेच्या आणि इतर गप्पा रंगल्या.

पुढील वर्षी कार्यक्रम जोरदार आणि पूर्वीच्या माजी विद्यार्थी संघ सारखा करावा असे ठरले. १९७५ च्या सुनील गोगटे पासून विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी  विद्यार्थिनीचे आभार  शाळे च्या वतीने श्री साळवेकर आणि श्री देशमुख मानले. शाळेची वेब साईट लवकरच लौंच होत आहे तसेच शाळेच्या व्यवस्थापन समितीत सध्या ११ पैकी ९ सदस्य माजी विद्यार्थी आहेत तेह्वा सर्व ती मदत करता येईल.

उपस्थितांची छायाचित्र लिंक खाली देत आहे. नावे लवकरच लोड होतील आणि ब्लॉग वर  पण देण्यात येतील.




पुढील वर्षी भेटू हे ठरवून सर्वांनी निरोप घेतला.

Thursday, January 20, 2011

Wamuz Yearly Meet on 26th Jan'2011 Confirmation Update




thttp://www.facebook.com/pages/Wamuz/139886292705236?v=wall







Sandeep Daund

Parag Oak
Dr.Vikas Gupte
Pramod Rane
Ravindra Gangal




Confirmed they r attending on 26+01+2011 at 9.00 am Sharada Nilayam, Gavan Pada, For Wamuz Yearly Meet





Sarang Dani & Dr. Rajesh  Chavan  informed that they  will be out of town !



http://wamumavisyearlymeet.blogspot.com/