Saturday, January 27, 2018

२६ जानेवारीच्या शाळा भेटी बद्दल............

२६ जानेवारीच्या शाळा भेटी बद्दल............

आम्ही १९८२ चे बॅचमेट्स नी आमच्या बॅच चे शाळा सोडून २५ वर्षे झाली म्हणून २००७ साली रियूनियन करायचे ठरवले अगदी जेवढे जमतील तेवढे सगळ्यांना मग काय तयारी सुरु झाली फोन इमेल एस एम एस आणि मागील पुढील वर्षांचे सहकारी ( चाचणी - सहामाही परीक्षेत बेंच शेअरिंग मंडळी ( अडले पडले तर तोंडी कॉपी मदत ) ...... हा हा हा ) ह्यांच्या मदतीने साधारण प्रत्येक तुकडीच्या ५० गुणिले तीन म्हणजे १५० जणांचा शोध सुरु झाला अगदी जगाच्या कुठल्याही काना कोपऱ्यात गेले असतील तरी शोध २००५ ते २००७ सुरु होता ................... जवळ जवळ १५० पैकी १३० जणांशी संपर्क साधला गेला ( जवळ जवळ १० जण शाळा सोडल्या पासून स्वर्गवासी झाले होते ) ८२ जणांनी यायचे निश्चित केले आणि ७३ जण आले मग यथावकाश दिवसभराचा कार्यक्रम ४ मे २००७ ला पार पडला अख्या दिवसाचा बँक्वेट हॉल आणि देश विदेशातून आलेले बॅचमेट्स तर एक दोघांनी त्याच काळात मोबाईल वरून संपर्क साधला मग त्या सर्व कार्यक्रम पुन्हा नव्याने ओळख , खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम ह्याचे व्हिडीओ चित्रण करून सी डी दिली गेली आणि थोडे दिवसांनी ते रियूनियन आजतागायत युट्युब व्हिडीओ म्हणून नेट वर पण आहे ....................असो

झाले काय रियूनियन्स विविध ठिकाणी होतात अगदी ह्या आधी ही झाली आहेत आणि पुढे ही होत राहतील पण हे सर्व करतांना पुढच्या मागच्या बॅच च्या लोकांनी सुचवले कि आपण पब्लिक प्लेस - सार्वजनिक ठिकाणी वर्षातुन एकदा भेटत जाऊया मग २६ जानेवारी २००८ ला आम्ही खूप सारे विविध वर्षांचे / बॅच चे शाळकरी मित्र- मैत्रिणी संभाजी पार्क वर जमलो पण तिथून २००९ सालापासून २६ जानेवारीला शाळेत आणि धूली वंदनाच्या दिवशी संभाजी पार्क वर भेटू लागलो ते आजतागायत अगदी काही वर्षी उपस्थिती रोडावली तर काही वेळा काही परदेशात असलेले बॅचमेट्स मुद्दाम ह्या दिवशी येऊन भेटून गेले.

मी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याने कुठल्याही दिवशी सुट्टी नसते अगदी आठवड्याची म्हणजे कॅलेंडर विकली ऑफ अथवा रोस्टर ऑफ हा प्रकार माझ्या नोकरीत नाही असो . पण त्या मुळे माझे वर्किंग शेड्युल अगदी नक्की झाले आणि मी मेसेज अपलोड केले

मी, प्रमोद राणे, अतुल माळी / समुग्धा माळी तसेच हेमंत देवस्थळी आणि १९८३ चे बॅचमेट्स ( फेसबुक ग्रुप वर फोटो पोस्ट आहे ) हे २६ जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनास शारदा निलायम परिसरात उपस्थित होतो. कार्यक्रम नंतर शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांना नमस्कार करून निघालो.

२००८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या शाळकरी मित्र मैत्रिणींच्या भेटीचा संभाजी पार्क वरील ग्रुप फोटो आपणा सर्वांच्या साठी पुन्हा एकदा इथे ब्लॉग पेज चा भाग म्हणून इथे अपलोड करत आहे.

फेसबुक ग्रुप   https://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/
प्रचलीत झाल्या पासून ब्लॉग थोडा मागे पडला असला तरी पण जुने सर्व फोटो आहेत तेव्हा आपणास शक्य झाल्यास ब्लॉग पाहावा.

http://wamumavisyearlymeet.blogspot.in