Sunday, May 22, 2011

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

वा. मु. मा. वि. च्या सर्व नेट वरील मित्र मैत्रीणीनो !

आम्ही १९८२ चे माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी एकंदर ७२ जण दिनांक ६ मे २००७ रोजी एकत्र जमल्यावर अथवा जमताना असे लक्षात आले कि केवळ एकाच वर्षाचे आणि सर्व तुकड्यांचे वा वर्गांचे नव्हे तर इतर वर्षांचे माजी विद्यार्थी एकमेकांना निदान वर्षातून एकदा भेटू इच्छितात म्हणून आम्ही २००८ पासून दरवर्षी २६ जानेवारी आणि धुलीवंदन असे दिवस ठरवले आणि नेहमी भेटण्यासाठी आवाहन करत होतो.

गेल्या पाच वर्षातील दळणवळण क्षेत्रातील क्रांतीने सर्वच जण अधिकच जोडले गेले आणि आता वर्ष १९९२ च्या माजी विद्यार्थिनी सानिका कुलकर्णी यांनी सुचवल्या प्रमाणे एक वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे आयोजीत होण्याविषयी आपली मते जाणून घेत आहे.

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे, हि पूर्ण व्यक्तिगणिक स्वखर्चावर असेल, संभाजी पार्क कट्ट्यावर जमल्यावर जमवलेल्या निधीतून अल्पोपहार आणि चहा मागवण्याचे ठरवण्यात येईल.

वर्षाकालीन सायंकाळ भेट ह्या कार्यक्रमात कुठलाही मार्केटिंग, चेन मार्केटिंग, राजकीय वा सामाजिक संघटना जोडणी वा प्रचार कार्यक्रम नसेल आणि नसावा हि विनंती.

सर्व इच्छुक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी आप - आपल्या जबाबदारीवर सार्वजनीक ठिकाण भेट ह्या सदरात वा प्रकारात भेट घेतील अशी खात्री आहे.

तेह्वा भेटूया का ?

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

Friday, May 6, 2011

सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आज अक्षय तृतीया,

पिकलेल्या हापूस आंब्याची अवीट गोडी घेण्याचा मुहूर्त !

सोने, चांदी आणि स्थावर मालमत्ता खरेदी मुहूर्त !

आपल्या शाळेच्या काळात सुट्टीचे १५ - २० दिवस निघून जाऊन पुन्हा आपल्या मित्रांचे आणि मैत्रिणींची आठवण यायला सुरवात होणारा काळ !

आजही त्या आठवणी ताज्या आहेत आणि असतात पण काळाच्या ओघात आणि धकाधकीच्या आयुष्यात विसराला होणाऱ्या आठवणी जणू ताज्या होतात ते केवळ ह्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे !

अगदी १९७५ पासूनच्या सुनील गोगटे पासून सर्व दरवर्षी होणाऱ्या वर्षातील दोन भेटींना येत राहिले आणि आता फेसबुक ग्रुपवर तर शैलेश कामत ( १९७८), प्रसाद जोशी ( १९९०) आणि मंदार पाटणकर (१९८८) आदींनी जगभरातून " फक्त वामुमावि च्या १९७५ पासूनच्या माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनीसाठी" ग्रुप साठी मित्र - मैत्रिणी जोडले.

विसरू नका ! १९७५ पासून दरवर्षी निदान ५० जण तरी संगणक जाणारे अथवा दरवर्षीच्या संख्येपैकी ३० जण तरी इंटरनेट शी जोडले असतील तेह्वा "१००१" सदस्य संख्या होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अनेक जणही वैयक्तिकरित्या अनेक वर्गमित्रांना आणि वर्गमैत्रीणीना जोडत आहेत,जोडत राहतील अशी खात्री आहे.

तेव्हा आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !