Wednesday, January 26, 2011

वामुझ ! प्रजासत्ताक दिन २०११ ! माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी - भेट वृतांत !


वामुझ !  प्रजासत्ताक दिन  २०११  !  माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी - भेट वृतांत !

गेले चार वर्षे, म्हणजे आमच्या १९८२ च्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी रौप्य महोस्तव भेटी नंतर ( दिनांक ७ मे २००७ ) ...................



विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी संपर्काने असे ठरवण्यात आले की वर्षातून दोन दिवस सार्वजनिक ठिकाणी म्हणजे संभाजी पार्क कट्टा येथे भेटण्याचे करावे त्या साठी २६ जानेवारी आणि होळी दुसरा दिवस ठरवण्यात आला. 

२००८ साली आम्ही संभाजी पार्क कट्ट्या वर भेटलो त्याचे छायाचित्र 


२००९ च्या २६ जानेवारीला असे ठरले की माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थनी - भेट कार्यक्रम शाळेत म्हणजे शारदानिलायाम ह्या शाळेच्या संकुलात घेण्यात यावा आणि त्या प्रमाणे झाले.

पहा आणि ऐका !
http://wwwhttp://www.youtube.com/watch?v=&feature=player_इम्बेद्देद

भेटी विषयी इतर माहिती आणि सामील झालेल्यांची नावे खालील ब्लॉग वर देण्यात आली आहेत.

सर्व माहिती साठी वेळ काढून ब्लॉग पूर्णपणे पाहावा आणि  मूवी क्लिप्स पहाव्यात / ऐकाव्यात !

२६ जानेवारी २०११ च्या बाबत वृत्त 

साधारणता: सकाळी साडे नऊ नंतर एकंदर वीस माजी विद्याथी आणि माजी विद्यार्थांनीनी शाळेच्या शारदा नीलायम संकुलात उपस्थित झाले. शाळेच्या व्यवस्थापन समिती पैकी श्री आशुतोष साळवेकर, किरण देशमुख आणि श्री. दीपक जोशी यांनी सर्वांच स्वागत केले.

श्री आशुतोष साळवेकर यांनी जिमखाना / जिमन्याशीयम बद्दल माहिती दिली. संध्याकाळी  पाच ते आठ वाजे पर्यंत माजी  विद्याथी आणि माजी विद्यार्थांनीनी ह्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

शाळेच्या जुनिअर कॉलेज बद्दल आणि इतर प्रशासनिक माहिती काही जनांनी आस्थेने विचारली, 

सर्व माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनीची ओळख आणि संक्षिप्त माहित कार्यक्रम झाला, शाळेच्या आणि इतर गप्पा रंगल्या.

पुढील वर्षी कार्यक्रम जोरदार आणि पूर्वीच्या माजी विद्यार्थी संघ सारखा करावा असे ठरले. १९७५ च्या सुनील गोगटे पासून विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी  विद्यार्थिनीचे आभार  शाळे च्या वतीने श्री साळवेकर आणि श्री देशमुख मानले. शाळेची वेब साईट लवकरच लौंच होत आहे तसेच शाळेच्या व्यवस्थापन समितीत सध्या ११ पैकी ९ सदस्य माजी विद्यार्थी आहेत तेह्वा सर्व ती मदत करता येईल.

उपस्थितांची छायाचित्र लिंक खाली देत आहे. नावे लवकरच लोड होतील आणि ब्लॉग वर  पण देण्यात येतील.




पुढील वर्षी भेटू हे ठरवून सर्वांनी निरोप घेतला.

No comments: