Friday, March 2, 2018

वामुमावि माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी - वार्षिक धूलिवंदन - खुली भेट संभाजी पार्क कट्टा - वर्ष अकरावे - दिनांक २ मार्च २०१८

वामुमावि माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी -
वार्षिक धूलिवंदन - खुली भेट
संभाजी पार्क कट्टा - वर्ष अकरावे - दिनांक २ मार्च २०१८
-----------------------------------------------------------------
दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही संभाजी पार्क कट्ट्यावर (महानगर गॅस समोरील भागात ) जमलो आणि विविध वर्षाच्या माजी विद्यार्थी मित्रा बरोबर धुलीवंदनाच्या आनंद रंग खेळून लुटला
रविंद्र भोसले ( १९७७ ), प्रमोद राणे,सुनील बोरकर, सारंग दाणी, पराग ओक, दीपक करकरे, कुलदीप मोतीवाले, हेमंत आठवले, संदीप केदारी, आशिष शांडिल्य ( सर्व १९८२) त्या शिवाय हेमंत देवस्थळी (१९८३) स्वामी प्रसाद जोशी आणि शेखर लिखिते ( १९८५) तसेच संदीप बदादे आदी शाळकरी मित्र जमले होते, श्री विश्वास पाठक ( १९७७) आणि योगेश देशमुख ( १९८२) ह्यांनी फोन वरून जमलेल्या सर्वाना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.
२००७ साली आम्ही जे १९८२ च्या शाळकरी वर्ग मित्र मैत्रिणी यांनी जे आमच्या शालांत वर्षाच्या रौप्यमहोत्सवी भेट कार्यक्रम केला होता त्याचा आयोजनाचा भाग म्हणून मुलुंड पूर्वेला विविध सोसायटीज आणि भागात जाऊन धूलिवंदन शुभेच्छा दिल्या होत्या.
अगदी गेले सात वर्षे अव्याहत पणे हा फेसबुक ग्रुप प्रवाही राहिला तो .............. केवळ तुमच्या आमच्या सारख्या शाळकरी मित्र मैत्रिणी मुळे..................
धुली वंदन भेटी नंतर अगदी १९९९ च्या बॅच चे शाळकरी मित्र भेटले आणि प्रसन्न वाटले
स्टे कनेक्टेड
भेटत राहू
आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणी साठीचा ग्रुप
आणि
कुठल्याही जाहिराती, चेन मार्केटिंग, प्रमोशन्स तसेच राजकारण - समाजकारण शिवाय
केवळ निखळ शाळकरी मैत्री जपण्यासाठी ......................................
wamumavisyearlymeet.blogspot.in ( For Non FB users - only updates not wall )आमचे शालेय वर्षात माझ्या आठवणी प्रमाणे इयत्ता सातवी प्रयन्त म्हणजे १९७९ पर्यंत फाउंटन पेन होते आणि शाळेच्या बेंच वर पुढच्या मागच्यांना शाई लावून होळी - धूलिवंदन साजरे व्हायचे मग १९८० नंतर बॉल पेन नी हि गंमत हि हिरावून घेतली. वय वाढत गेले शाळा सुटली पाटी फुटली ........................ जगभरातील विविध मार्गावर आणि विविध भागात गेलेल्या सर्वाना जमवून रौप्यमहोत्सवी रियुनियन साजरे केले तेव्हा लक्षात आले कि दरवर्षी भेटलेला हवे मग हीच इच्छा हिरीरीने मंडळी दिवंगत श्री नितीन मुंढे यांनी पण .......................
मग मे २००७ नंतर लगेच २००८ च्या प्रजासत्ताक दिनी संभाजी पार्क वर आणि त्या नंतर शारदा निलायम संकुलात तर २००८ पासून दरवर्षी आम्ही संभाजी पार्क कट्ट्यावर धुलिवंदनाला भेट हा उपक्रम चालू केला सुरवातीला ब्लॉग वर अपडेट्स अपलोड करायचो अजूनही फेसबुक वर नसलेल्या साठी ब्लॉग अपडेट करतो पण खरी गंमत आणली हि १५ मार्च २०११ च्या दिवसांनी ...............
अगदी गेले सात वर्षे अव्याहत पणे हा फेसबुक ग्रुप प्रवाही राहिला तो .............. केवळ तुमच्या आमच्या सारख्या शाळकरी मित्र मैत्रिणी मुळे..................
धुली वंदन भेटी नंतर अगदी १९९९ च्या बॅच चे शाळकरी मित्र भेटले आणि प्रसन्न वाटले
स्टे कनेक्टेड
भेटत राहू
फक्त
आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणी साठीचा ग्रुप
आणि
कुठल्याही जाहिराती, चेन मार्केटिंग, प्रमोशन्स तसेच राजकारण - समाजकारण शिवाय
केवळ निखळ शाळकरी मैत्री जपण्यासाठी ......................................
( ताजा कलम : वामुमावि च्या शालेय विद्यार्थी मित्र मैत्रिणी व्यतिरिक्त शाळेतील आजी माजी शिक्षक, संस्था कर्मचारी आणि संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांना ह्या ग्रुप वर सामावून घेतले आहे पण इतर सर्वाना ग्रुप मध्ये सामावून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू नयेत कारण त्या नंतर ते सारे प्रमोशन्स, जाहिराती, संस्थेचे / संस्थांचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण ह्यात वाहून जाते.
इतर शाळेचा अथवा शाळांचा उल्लेख अथवा अपूर्ण माहितीची फेसबुक प्रोफाईल्स तसेच जाहिरात वाली प्रोफाईल्स ह्यांना ग्रुप मध्ये सामावून घेत नाही
फेसबुक ग्रुप वर येणारे लिखाण तसेच कोंमेन्टस हे ऍडमिन ग्रुप तर्फे सर्वसाधारण पणे मॉनिटर / बघून अँप्रूव्ह केले जातात पण लिखाणाचा सर्व जबाबदारी हि फक्त पोस्ट कर्त्यांची आहे आणि ऍडमिन त्यास जबाबदार नाही
कुठलीही वर्गणी, देणगी तसेच सभासद मूल्य  फेसबुक लादत नाही तो पर्यंत घेत नाही / घेणार नाही आणि देत नाही / देणार नाही.
१५ मार्च २०११ ह्या फेसबुक ग्रुप स्थापना दिवसा निम्मित शालेय मित्र मैत्रिणीच्या नातेवाईक, हितचिंतक आणि पालक ह्यांना बघण्या साठी ग्रुप केवळ वर्षातून पंधरा दिवस १५ मार्च ते  ३१ मार्च मध्ये  क्लोस्ड ऐवजी ओपन ठेवण्यात येईल पण केवळ शाळकरी मित्र मैत्रिणी शिवाय अन्य कोणाच्या मेम्बरशिप रिक्वेस्ट अथवा पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत.
ग्रुप चा शाळेच्या संस्थेशी तसेच अन्य कुठल्या संस्था राजकारण, समाजकारण, अर्थकारण तसेच चेन मार्केटिंग, जाहिराती आदींशी संबंध नाही आणि त्याचा उल्लेख असलेला पोस्ट स्वीकारल्या जाणार नाहीत
केवळ शाळेच्या काळातील निखळ मैत्री जपण्यासाठी !

https://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/


wamumavisyearlymeet.blogspot.in ------- For non FB users - only updates 


Saturday, January 27, 2018

२६ जानेवारीच्या शाळा भेटी बद्दल............

२६ जानेवारीच्या शाळा भेटी बद्दल............

आम्ही १९८२ चे बॅचमेट्स नी आमच्या बॅच चे शाळा सोडून २५ वर्षे झाली म्हणून २००७ साली रियूनियन करायचे ठरवले अगदी जेवढे जमतील तेवढे सगळ्यांना मग काय तयारी सुरु झाली फोन इमेल एस एम एस आणि मागील पुढील वर्षांचे सहकारी ( चाचणी - सहामाही परीक्षेत बेंच शेअरिंग मंडळी ( अडले पडले तर तोंडी कॉपी मदत ) ...... हा हा हा ) ह्यांच्या मदतीने साधारण प्रत्येक तुकडीच्या ५० गुणिले तीन म्हणजे १५० जणांचा शोध सुरु झाला अगदी जगाच्या कुठल्याही काना कोपऱ्यात गेले असतील तरी शोध २००५ ते २००७ सुरु होता ................... जवळ जवळ १५० पैकी १३० जणांशी संपर्क साधला गेला ( जवळ जवळ १० जण शाळा सोडल्या पासून स्वर्गवासी झाले होते ) ८२ जणांनी यायचे निश्चित केले आणि ७३ जण आले मग यथावकाश दिवसभराचा कार्यक्रम ४ मे २००७ ला पार पडला अख्या दिवसाचा बँक्वेट हॉल आणि देश विदेशातून आलेले बॅचमेट्स तर एक दोघांनी त्याच काळात मोबाईल वरून संपर्क साधला मग त्या सर्व कार्यक्रम पुन्हा नव्याने ओळख , खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम ह्याचे व्हिडीओ चित्रण करून सी डी दिली गेली आणि थोडे दिवसांनी ते रियूनियन आजतागायत युट्युब व्हिडीओ म्हणून नेट वर पण आहे ....................असो

झाले काय रियूनियन्स विविध ठिकाणी होतात अगदी ह्या आधी ही झाली आहेत आणि पुढे ही होत राहतील पण हे सर्व करतांना पुढच्या मागच्या बॅच च्या लोकांनी सुचवले कि आपण पब्लिक प्लेस - सार्वजनिक ठिकाणी वर्षातुन एकदा भेटत जाऊया मग २६ जानेवारी २००८ ला आम्ही खूप सारे विविध वर्षांचे / बॅच चे शाळकरी मित्र- मैत्रिणी संभाजी पार्क वर जमलो पण तिथून २००९ सालापासून २६ जानेवारीला शाळेत आणि धूली वंदनाच्या दिवशी संभाजी पार्क वर भेटू लागलो ते आजतागायत अगदी काही वर्षी उपस्थिती रोडावली तर काही वेळा काही परदेशात असलेले बॅचमेट्स मुद्दाम ह्या दिवशी येऊन भेटून गेले.

मी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याने कुठल्याही दिवशी सुट्टी नसते अगदी आठवड्याची म्हणजे कॅलेंडर विकली ऑफ अथवा रोस्टर ऑफ हा प्रकार माझ्या नोकरीत नाही असो . पण त्या मुळे माझे वर्किंग शेड्युल अगदी नक्की झाले आणि मी मेसेज अपलोड केले

मी, प्रमोद राणे, अतुल माळी / समुग्धा माळी तसेच हेमंत देवस्थळी आणि १९८३ चे बॅचमेट्स ( फेसबुक ग्रुप वर फोटो पोस्ट आहे ) हे २६ जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनास शारदा निलायम परिसरात उपस्थित होतो. कार्यक्रम नंतर शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांना नमस्कार करून निघालो.

२००८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या शाळकरी मित्र मैत्रिणींच्या भेटीचा संभाजी पार्क वरील ग्रुप फोटो आपणा सर्वांच्या साठी पुन्हा एकदा इथे ब्लॉग पेज चा भाग म्हणून इथे अपलोड करत आहे.

फेसबुक ग्रुप   https://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/
प्रचलीत झाल्या पासून ब्लॉग थोडा मागे पडला असला तरी पण जुने सर्व फोटो आहेत तेव्हा आपणास शक्य झाल्यास ब्लॉग पाहावा.

http://wamumavisyearlymeet.blogspot.in


Tuesday, November 7, 2017

मैफिल जमली पन्नाशीची !

 ऋणानुबंध - प्रशाळा ते जीवनशाळा 

४ आणि ५ नोव्हेंबर २०१७


वामुमावि १९८२ - मैफिल जमली पन्नाशीची
ऋणानुबंध ..... प्रशाळा ते जीवनशाळा !

💐💐💐सर्वांचे हार्दिक आभार ! 💐💐💐

जवळ जवळ पासष्ट जणांच्या उपस्थितीमुळे, सारंग दाणी यांच्या बहारदार 
सूत्रसंचालनामुळे, प्रमोद राणे , पराग ओक , हेमंत धारप , संजीव केळकर , 
सुहास करमाळकर , माधवी वैद्य - गोखले , आरती लाड दाणी , आरती जोशी भट 
आणि संगीता तळवडेकर साटम 
विशेष ध्वनी तंत्र संयोजन साहाय्य : संदीप पेडणेकर आणि अमोल रांगणेकर 
पौर्णिमा विशेष पटांगण नृत्य व्यवस्था : देवेंद्र पालव 
यांच्या मेहनती मुळे, पन्नाशीची मैफिल अत्यंत 
संस्मरणीय झाली त्या बद्दल सर्वानाच मनःपूर्वक धन्यवाद !!!



Wednesday, March 23, 2016

धुळवड - रंगौत्सव गुरुवार, दिनांक २४ मार्च २०१६, रोजी, संभाजी पार्क कट्टा,

धुळवड - रंगौत्सव

माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी वार्षिक स्वेच्छा भेट


वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनी,
इसवी सन २००८ पासून दरवर्षी धुळवड - रंगौत्सव भेटी साठी दरवर्षी प्रमाणे सकाळी दहा वाजता यंदाही, गुरुवार, दिनांक २४ मार्च २०१६, रोजी, संभाजी पार्क कट्टा,
महानगर गेसं समोरील भागात जमणार आहेत.

सदर भेटी बाबत
पराग ओंक ( १९८२) आणि वर्गमित्र
तसेच
हेमंत देवस्थळी ( १९८३) आणि वर्ग मित्र

यांनी स्वारस्य दाखवले आहे तरी ज्या माजी विद्यार्थी- माजी विद्यार्थिनी यांना "धुळवड - रंगौत्सव" सामील होण्याचे उत्सुकता असेल त्यांनी सकाळी दहा ते अकरा वेळेत सदर ठिकाणी आपल्या वैयक्तिक स्तरावर कुठल्याही फी - देणगी शिवाय जमावे. 


सदर भेट कार्यक्रमाचा शाळा व्यवस्थापन - ट्रस्ट यांचा संबंध नाही याची नोंद घ्यावी.

Strict Warning : Don't use Water at this location for Celebration!

Check one of the old picture memory for
the Holi Second Day Celebration


Monday, January 18, 2016

प्रजासत्ताक दिन स्वेच्छा भेट - २६ जानेवारी २०१६

वा मु मा वि - माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी 


इस वि सन २००९ पासून शारदा नीलायम संकुलात, 

प्रजासत्ताक दिनी

प्रजासत्ताक दिन स्वेच्छा भेट !


म्हणजे दरवर्षी २६ जानेवारी रोजी शालेय झेंडा वंदन 

आणि त्या नंतर 

१९७५ पासून विविध वर्षांचे माजी विद्यार्थी - माजी 

विद्यार्थिनी यांचा शाळेस स्वेच्छा भेट ठरलेली आहे 

आणि यंदाही मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०१६ 

रोजी शालेय झेंडा वंदनानंतर शारदा नीलायम 

संकुलात जमणार आहोत.

तरी १९७५ पासूनच्या सर्व माजी विद्यार्थी - माजी 

विद्यार्थिना शक्य आहे  त्यांनी २६ जानेवारी २०१६

 रोजी शालेय झेंडा वंदनानंतर म्हणजे 

सकाळी ८:३० नंतर शारदा नीलायम संकुलात जमावे 

हि नम्र विनंती !

Monday, January 26, 2015

प्रजासत्ताक दिन शाळा भेट २६ जानेवारी २०१५

प्रजासत्ताक दिन शाळा भेट

 

आज २६ जानेवारी २०१५ रोजी, वामनराव मुरांजन शाळेच्या, १९७५ पासूनच्या
विविध वर्षातील, खालील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी आज शाळा समूहाच्या
प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानंतर, शारदानीलायम संकुलातील तळमजल्यावरील
वातानुकुलीत सभागृहात जमले होते.

 

 

१) डॉ. सुषमा महाबळ रामचंदानी ( १९८३)
२) डॉ निरुपमा गोखले ( वृषाली देशमुख ) ( १९८३)
३) शिल्पा पालकर ( शिल्पा देशपांडे ) ( १९८३)
४) आमोद परांजपे ( १९८३)
५) पुरषोत्तम ताह्मणकर ( १९८३)
६) विनीत कुलकर्णी ( १९८३)
७) प्रमोद राणे ( १९८३)
८) शशांक कामत ( १९८३)
९) हेमंत देवस्थळी ( १९८३)
१०) नूतन म. मुळे ( नूतन सु कानडे ) (१९९१)
११) मंगेश कांडरकर ( १९८७)
१२) दीपक रमेश साटम ( १९९१)
१३) स्मुग्धा दिवाकर भगत ( स्मुग्धा माळी ) (१९९१)
१४) नितीन प्रभाकर मुंढे (१९८०)
१५) मिलिंद सावंत ( १९८३)
१६ ) रविंद्र गांगल ( १९८२)

 

 

शाळा व्यवस्थापन समिती तर्फे डॉ आनंद प्रधान, श्री किरण देशमुख, दीपक जोशी,
श्री रवि परांजपे, श्री संजय नवलगुंद  तर शिक्षक समुदाय तर्फे श्री चव्हाण सर,
श्री तासकर सर, श्री सुतार सर आणि सौ कुलकर्णी माडम उपस्थित होते 

आणि शाळा
समूहाच्या पुढील योजना आणि वातानुकुलीत सभागृह या उपक्रमा बदल माहिती दिली.

सर्वांनी एकमेकाची ओळख करून घेतली
आणि
आपल्या वर्षातील शाळेच्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी वार्षिक
कार्यक्रमांची माहिती दिली आणि घेतली.

 

शाळा समिती तर्फे अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती.

छोट्या आणि गोड कार्यक्रमाची सांगता स्मुग्धा माळी - भगत
यांच्या एका छोट्या सुश्राव्य गाण्यांनी झाली.

 

शारदा नीलायम उभारणी च्या वेळी, सर्व वर्षातील माजी विद्यार्थी - माजी
विद्यार्थिनी यांचे एक स्नेह संमेलन भरवण्यात आले होते तसे एक सर्व
समावेशक अर्थात सर्व माजी / आजी शिक्षक - सर्व माजी - आजी
व्यवस्थापन समिती आणि सर्व माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी
यांचे एक स्नेह संमेलन आणि शाळा समूहाच्या विस्तारीकरणासाठी
संकलन कार्यकम घेण्यात यावा अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

 

https://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/ 

 https://www.facebook.com/media/set/?set=oa.843360152369788&type=1

Wednesday, January 21, 2015

२६ जानेवारी २०१५ - सोमवार - वेळ सकाळी ८ नंतर - शारदा नीलायम संकुल प्रजासत्ताक दिन - माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी शाळेस भेट कार्यक्रम !

२६ जानेवारी २०१५ - सोमवार -  वेळ सकाळी ८ नंतर 

शारदा नीलायम संकुल - प्रजासत्ताक दिन - 

माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी शाळेस भेट कार्यक्रम !


हेमंत देवस्थळी (वर्ष १९८३) यांनी लिंक केलेला आपल्या "वामनराव मुरांजन" फेसबुक ग्रुप
वर  १९८३ च्या स्मरणीय " कृतज्ञता सोहळा" अल्बम तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. नसेल तर आवर्जून पहा

६ मे २००७ रोजी आमच्या १९८२ च्या एकंदर ७२ जणांच्या दिवस भराच्या पुनर्भेट
कार्यक्रमानंतर आमच्या वर्षातील आणि मागच्या - पुढच्या वर्षातील शाळकरी
मित्र - मैत्रिणीनी, आप आपल्या शालेय वर्षाच्या पलीकडील शालेय मित्र - मैत्रीणीना
भेटण्याचा  मानस व्यक्त केला.

मग

आपण सर्व शालेय वर्षातील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी दरवर्षी २६ जानेवारी
२००८ पासून शारदा नीलायम संकुलात जमू लागलो. कधी यंदासारख्या लागून
आलेल्या सुट्टी मुले कमी जमले तर कधी शाळेचा खालचा हौल भरून गेला...........

मग येताय ना .......................!

१९७५ पासूनच्या विविध वर्षाच्या माजी विद्यार्थी - विद्यार्थीनीना भेटण्या साठी !

२६ जानेवारी २०१५ - सोमवार - 
वेळ सकाळी ८ नंतर - शारदा नीलायम संकुल
प्रजासत्ताक दिन - माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी
शाळेस भेट कार्यक्रम !

टीप : या आधीच्या काही भेटी संबंधी ब्लॉग आहे तो आवर्जून पहा
अथवा खास करून फेसबुक वर नसलेच्या शालेय मित्र - मैत्रीणीना पाठवा !

Friday, March 14, 2014

Holi Second Day Wamuz Meet ! 2014 !

Holi Second Day Wamuz Meet ! 2014 !

Along with all other batches of Wamuz,
Since 2009 
at 
Sambhaji Park !
This year at Same Location
i.e. 
Sambhaji Park - 
Opp MGL office
on 
17th of March - Monday 
9:30 Hrs Onward 
File Photo of 2008's Holi Second Day !

Saturday, January 25, 2014

प्रजासत्ताक दिन - वामुमावि - माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी भेट दिन २०१४

प्रजासत्ताक दिन - वामुमावि - माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी भेट दिन २०१४

उपस्थिती :
१) सुधीर देशमुख ( १९७६)
२) रविंद्र भोसले ( १९७६)
३) मंदार पाटणकर ( १९८७)
४) प्रमोद राणे ( १९८२)
५) संजीव केळकर ( १९८२)
६) रविंद्र गांगल ( १९८२)
७) नितीन झेंडे ( १९८१)

संस्था कमिटी सदस्य - सहकार्य - उपस्थिती
१) रवि परांजपे
२) किरण देशमुख
३) आशुतोष साळवेकर
४) दीपक जोशी
५) संजय नवलगुंद





Saturday, December 14, 2013

भेटूया मग प्रजासत्ताक दिनी , २६ जानेवारी २०१४

 भेटूया मग प्रजासत्ताक दिनी , २६ जानेवारी २०१४ 

ठीक सकाळी ८ वाजता शारदा नीलायम मध्ये..........

पुढे संभाजी पार्क कट्ट्यावर गप्पा मारायला 

१९७५ पासूनचे सर्व माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी दरवर्षी वर्षातून दोन दिवस म्हणजे २६ जानेवारी आणि धुलवडीच्या दिवशी गेली काही वर्षे एकमेकांना भेटत आहेत 

२०१४ च्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे रविवार दिनांक २६ जानेवारी २०१४ रोजी पण १९७५ पासूनचे सर्व माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी ठीक आठ वाजता शारदानीलायम परिसरात झेंडा वंदनला प्रेक्षक म्हणून त्या नंतर शाळा परिसर तसेच संभाजी पार्क परिसरात जमणार आहेत.सदर भेट, सर्व १९७५ पासूनचे सर्व माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी साठी हि व्यक्तिगत पातळी असून सर्व वर्षांचे माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनीअपेक्षित आहेत.

कुठलीही देणगी / वर्गणी सदर कार्यक्रमासाठी नाही आणि तेथे होणारा अल्पोपहार सामुदायिक वर्गणी पद्धतीने केला जाईल. याची नोंद घ्यावी.हा कार्यक्रम माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी कडून शाळा भेट आणि मैत्री भेट प्रकारात असून शाळेच्या व्यवस्थापन समितीतील दोन प्रतिनिधी, सर्व माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी आनंदाने स्वागत करून सहभागी होतात.

Wednesday, February 29, 2012

काय येणार का ? शाळेतल्या जुन्या सवंगड्या बरोबर रंग खेळाला !

आम्ही फोटोत असलेले १९८२ च्या दहावीचे, वा., मु. मा. वि. चे विद्यार्थी, २००७ साली आम्ही २५ वर्षांनी ७२ जण जमल्यावर २००८ साली मुलुंड मध्ये मित्रांची - शाळा सोबत्यांची घरे - सोसायट्या शोधत मस्त रंग खेळलो.

२००९ पासून न चुकता सर्वच वर्षांच्या शाळा सोबत्या - सवंगड्या बरोबर म्हणजेच १९७५ च्या सर्व माजी विद्यार्थ्या बरोबर संभाजी पार्क च्या अरुणोदय नगर - संभाजी राजे सभागृह - महानगर च्या समोरील चौकात रंग खेळाला धूळवड अर्थात होळी सेकण्ड डे जमतो.

यंदाही दिनांक ८ मार्च २०१२ गुरवार रोजी सकाळी ९:३० नंतर अरुणोदय नगर - संभाजी राजे सभागृह - महानगर च्या समोरील चौकात रंग खेळाला जमणार आहोत !

तुम्हाला जमत नसेल तरी जमवून या ! शाळेत फौंटन पेनाची शाई उडवण्याची गम्मत काही और होती !

ते दिवस पुन्हा येणार नाहीत पण आठवणी मध्ये - गप्पा - गोष्टी मध्ये रंग लावून शाळेतल्या जुन्या सोबत्या बरोबर रंग खेळूया !


Facebook Event Notification for Group

http://www.facebook.com/events/398057380208520/ 

Facebook Group URL
http://www.facebook.com/groups/exstudentofwmmvsince1975/ 

Thursday, January 26, 2012

भेट : २६ जानेवारी २०१२ गुरवार रोजी सकाळी सकाळी ९ .३० नंतर ! शारदा नीलायम येथे !

माझ्या वा. मु. मा. वि. शाळेच्या १९७५ पासूनच्या विविध वर्षांच्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनीनो!

आपण दरवर्षी २६ जानेवारी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्यासाठी जमत असतो. आणि गेली पाच वर्षे विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनी याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

सकाळी ९ .३० नंतर शालेय परिसरातील महाविद्यालय, जिमखाना परिसराची ओळख करून घेऊन, मागील बाजूस म्हणजे शालेय व्यायाम कक्षा मागे / अल्पोपहार केंद्राच्या मागील बाजूस एकत्र जमलो. एकमेकाची ओळख, शाळेच्या विद्यमान कार्यकारणीच्या सभासद ( माजी विद्यार्थ्यांपैकी ) यांचे मनोगत - अनुभव - अपेक्षा यांचा समन्वय साधला.

उपस्थित शालेय मित्र

१) सुनील गोगटे १९७५
२) गिरीश करमरकर १९७५
३) रवींद्र भोसले १९७६
४ ) विकास कुलकर्णी १९७६
५ ) शिरीष गोखले १९७८
६) आशुतोष साळवेकर १९७८
7 ) किरण देशमुख १९७८
७ ) संदीप दौंड १९७९
८ ) मिलिंद काळे १९८०
९ ) राजन ताम्हाणे १९८१
१० ) पराग ओंक १९८२
११) सुनील बोरकर १९८२
१२) विकास गुप्ते १९८२
१३ ) जगदीश महाजन १९८२
१४ ) रविंद्र गांगल १९८२
१५ ) हेमंत देवस्थळी १९८३
१६ ) संतोष ताम्हाणे १९८४
१७ ) निलेश धोपटकर १९८६

एकीकडे एकमेकांशी ओळख करून घेत अल्पोपहार - चहा पण झाले.

अल्पोपहार आणि चहापान यांची व्यवस्था श्री किरण देशमुख / श्री आशुतोष साळवेकर यांनी संस्थे मार्फत श्री जोशी - शालेय अल्पोपहारगृहातून केली खालील बाबी वर सगळ्यांचे एकमत झाले

१) सर्वच माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी यांनी दरवर्षी आपआपल्या परीने २६ जानेवारी रोजी शारदा नीलायम येथे सकाळी ९ वाजता आणि होळी च्या दुसऱ्या दिवशी संभाजी पार्क च्या चौकात - एम. गि. एल. ऑफिस समोर सकाळी ९.३० वाजता जमणे.

२) २०१२ मध्ये तीन - चार महिन्यात शाळेच्या सभागृहात अथवा अन्य ठिकाणी एकत्र सर्व वर्षाच्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी साठी एक पूर्ण वेळचा स्नेह मेळावा - भेट आयोजित करणे.

प्रजासत्ताक भेटी आधी अथवा नंतर, श्री रवी परांजपे १९७५, श्री मनोज कार्लेकर १९८१ आणि श्री दीपक करकरे १९८२ यांची बऱ्याच जण्यांशी भेट झाली.

टीप : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या भेटी निम्मिताने जमणे झाले पण आता फेसबुक ग्रुप माध्यमातून बरेच जन संपर्कात असल्याने कुठल्या प्रकारची नोंद वही / संपर्क पत्ते घेणे झाले नाही तरी उपस्थितांच्या नावामध्ये काही फेर बदल करायचा असल्यास वा नाव राहून गेले असल्यास कळवणे.
ह्या भेटी दरम्यान कुठलेही फोटो काढण्यात आले नाहीत - क्षमस्व:

पुढील एकत्र भेट ८ मार्च २०१२ गुरवार रोजी सकाळी संभाजी पार्क च्या चौकात - एम. गि. एल. ऑफिस समोर सकाळी ९.३० वाजता जमणे.

Thursday, November 3, 2011

भेटूया का ? २६ जानेवारी २०१२ गुरवार रोजी सकाळी आठ च्या पुढे ! शारदा नीलायम येथे !

माझ्या  वा. मु. मा. वि. शाळेच्या  १९७५ पासूनच्या विविध वर्षांच्या माजी विद्यार्थी - माजी  विद्यार्थीनीनो !

आपण दरवर्षी २६ जानेवारी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्यासाठी जमत असतो. आणि  गेली चार - पाच वर्षे विविध वर्षातील  माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनी याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

इस २०१२ मधील २६ जानेवारी, गुरवारी येत आहे. आधीचा अनुभव असा आहे  २६ जानेवारी, शनिवार / रविवार अथवा अन्य सुट्टीला जोडून आली तर  प्रतिसाद चांगला नसतो. पण ह्या वर्षी आपण फेसबुक माध्यमातून जोडले गेले आहोत आणि ग्रुप सभासद संख्या साधारतः ५०० च्या घरात / जवळपास  आहे.

वर्षाकालीन कालिदास स्मरण दिनी आणि गेल्या २६ जानेवारीला सर्वांनी वाढता प्रतिसाद दिला होता आणि यंदाही म्हणजे  २६ जानेवारी २०१२ , गुरवारी तो मिळेल अशी खात्री आहे.

साधारण नियोजित  रूपरेषा अशी

सकाळी ८ वाजता शारदा नीलायम येथील शालेय झेंडा वंदनाला उपस्थित राहणे.

सकाळी ९ वाजता त्या नंतर शालेय परिसरातील महाविद्यालय, 
जिमखाना परिसराची ओळख करून घेऊन, मागील बाजूस म्हणजे शालेय व्यायाम कक्षा मागे / अल्पोपहार केंद्राच्या मागील बाजूस एकत्र जमणे.  एकमेकाची ओळख, शाळेच्या विद्यमान कार्यकारणीच्या सभासद ( माजी विद्यार्थ्यांपैकी ) यांचे मनोगत - अनुभव - अपेक्षा  यांचा समन्वय साधणे.

बरोबरच सर्वाना आवडेल - रुचेल असा एखादा खेळ म्हणजे शाळेच्या मैदानाला प्रत्येक वर्ष - दोन वर्षाच्या उपसमूहावार  शाळेच्या आवारात नाहीतर जवळील संभाजी पार्क जॉगिंग पाथ वर " जलद चालणे स्पर्धा " ठेवणे.

अल्पोपहार - चहापान

माफक वैयक्तिक खर्च - निधी जमवणे - जर खर्च सर्वांवर पडलाच तर !

नोंद असावी :

भेट ह्या कार्यक्रमात कुठलाही मार्केटिंग, चेन मार्केटिंग, राजकीय वा सामाजिक संघटना जोडणी वा प्रचार कार्यक्रम नसेल आणि नसावा हि विनंती.

सर्व इच्छुक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी आप - आपल्या जबाबदारीवर सार्वजनीक ठिकाण भेट ह्या सदरात वा प्रकारात भेट घेतील अशी खात्री आहे.
-------------------------------------------

आपण मुलुंड / महामुंबई बाहेरील परिसरात वास्तव्याला असाल तर वेळेत आपला  वर्ग मित्र - मैत्रिणीच्या अथवा जुने शाळा सोबती यांच्या सहकार्याने उपस्थित राहायचे ठरवू शकाल का ?

-------------------------------------------

आपल्या ब्लॉग / इ - मेल / फेसबुक वरील प्रतिसादा प्रमाणे कार्यक्रम नक्की करता येईल
आणि संस्था कार्यकारिणी सदस्यांशी समन्वय साधता येईल.
----------------------------------------------------


भेटूया का ?  
२६ जानेवारी २०१२ गुरवार रोजी सकाळी आठ च्या पुढे ! 
शारदा नीलायम येथे ! 

Monday, July 4, 2011

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रम

वा. मु. मा. वि. च्या माजी विद्यार्थी / विद्यार्थिनीनो,

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा,
महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रम हा आपण सर्वांनी सहभाग घेतलात म्हणून संपन्न झाला.

हेमंत बापट १९९०
विवेक अमोणकर १९९०
सरिता जोशी १९९०
शीतल चव्हाण ( शिंदे) १९९०
रेवती बापट ( भिडे ) १९९०
सुलक्षणा तांबोळी ( सन्याल) १९९०
मनीष कुलकर्णी १९९०
मंदार पाटणकर १९८८
सचिन अकुडे १९९२
प्रवीण काळे १९९२
वैभव वाघमारे १९९२
सचिन सावंत १९९२
सानिका कुलकर्णी १९९२

नयना माडीवाले १९९०
योगेश कुलकर्णी १९९२
किरण देशमुख १९७८
अमूल पतंगे १९७८
रविंद्र भोसले १९७६
विश्वास फाटक १९७६
विक्रम राजपूत १९९०
अश्विन भोईर १९९०
निलेश लोणकर १९९०
अभय गुरव १९९०
संतोष थोरात १९९०
संदीप कदम १९८९
ललित मालवणकर १९९०
निलेश वाणी १९८८
विशाल गायकवाड १९९०
वंदना प्रधान १९७८
वंदना कारंडे शिंदे १९८८
प्रमोद राणे १९८२
रविंद्र गांगल १९८२ 
माधव कळमकर १९७६ 

संध्याकाळी साधारणतः पाच नंतर संभाजी पार्क कट्ट्यावर संभाजी राजे भोसले सभागृहाच्या कॉर्नर जवळ सर्व माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी भेट हा कार्यक्रम झाला. उपस्थित सर्वांनी एकमेकांची ओळख करून घेतली. १९७६ च्या विश्वास फाटक आणि रविंद्र भोसले यांची सर्व उपस्थितांना सर्वात वरिष्ठ म्हणून माहिती करून देण्यात आली.

२००८ च्या प्रजासत्ताक दिनापासून, प्रजासत्ताक दिनी " शारदा नीलायम" संकुलात आणि धुळवडीच्या म्हणजे होळी सेकंड डे, अर्थात सुट्टीच्या दिवशी दरवर्षी माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी एकमेकांना नित्यनेमाने भेटत आहेत.

पण आता फेसबुक समूह निर्मिती नंतर प्रथमच, "वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन" चे आयोजन करण्यात आले.

वर्षा सहल आयोजनाविषयी सर्वच वर्षातील आयोजन हे जर कोणी पुढाकार घेऊन करत असेल तर त्यांनी फेसबुक वरील समूहावर आवाहन करावे आणि आयोजन करावे असे ठरले.

रक्त गट नोंदणी विषयक नोंद पुस्तिका अर्थात ओंन लाईन डोकुमेंत करण्याचे ठरले व हे पोस्ट टाकताना त्याची निर्मिती करण्यात आली, त्या मधील संपर्क क्रमांक, आय डी आपआपल्या जबाबदारी वर द्यावेत हि विनंती.

सर्वच उपस्थितांनी, एकमेकाशी संवाद साधत स्वसहभागाने, अल्पोपहार कांदा भजी आणि चहा यांचा आस्वाद घेतला. 

ह्या आयोजनात श्री विजय काळे १९७६ आणि श्री प्रमोद राणे १९८२, यांचे विशेष सहकार्य लाभले.

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २०११ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, 
महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा, येथे झालेला कार्यक्रमाची काही छाया चित्रे येथे देत आहे तरी आणखीन छायचित्रे उपस्थितांपैकी लोड केली तर अधिक रंगत येईल.





http://www.facebook.com/home.php?sk=group_190571124315364

Sunday, May 22, 2011

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

वा. मु. मा. वि. च्या सर्व नेट वरील मित्र मैत्रीणीनो !

आम्ही १९८२ चे माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी एकंदर ७२ जण दिनांक ६ मे २००७ रोजी एकत्र जमल्यावर अथवा जमताना असे लक्षात आले कि केवळ एकाच वर्षाचे आणि सर्व तुकड्यांचे वा वर्गांचे नव्हे तर इतर वर्षांचे माजी विद्यार्थी एकमेकांना निदान वर्षातून एकदा भेटू इच्छितात म्हणून आम्ही २००८ पासून दरवर्षी २६ जानेवारी आणि धुलीवंदन असे दिवस ठरवले आणि नेहमी भेटण्यासाठी आवाहन करत होतो.

गेल्या पाच वर्षातील दळणवळण क्षेत्रातील क्रांतीने सर्वच जण अधिकच जोडले गेले आणि आता वर्ष १९९२ च्या माजी विद्यार्थिनी सानिका कुलकर्णी यांनी सुचवल्या प्रमाणे एक वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे आयोजीत होण्याविषयी आपली मते जाणून घेत आहे.

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे, हि पूर्ण व्यक्तिगणिक स्वखर्चावर असेल, संभाजी पार्क कट्ट्यावर जमल्यावर जमवलेल्या निधीतून अल्पोपहार आणि चहा मागवण्याचे ठरवण्यात येईल.

वर्षाकालीन सायंकाळ भेट ह्या कार्यक्रमात कुठलाही मार्केटिंग, चेन मार्केटिंग, राजकीय वा सामाजिक संघटना जोडणी वा प्रचार कार्यक्रम नसेल आणि नसावा हि विनंती.

सर्व इच्छुक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी आप - आपल्या जबाबदारीवर सार्वजनीक ठिकाण भेट ह्या सदरात वा प्रकारात भेट घेतील अशी खात्री आहे.

तेह्वा भेटूया का ?

वर्षाकालीन सायंकाळ भेट हा कार्यक्रम दिनांक २ जूले, २००१ शनिवार, आषाढ शुद्ध प्रतिपदा, महाकवी कालिदास दिन सायंकाळ ठीक ५ च्या पुढे संभाजी पार्क कट्टा येथे !

Friday, May 6, 2011

सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

आज अक्षय तृतीया,

पिकलेल्या हापूस आंब्याची अवीट गोडी घेण्याचा मुहूर्त !

सोने, चांदी आणि स्थावर मालमत्ता खरेदी मुहूर्त !

आपल्या शाळेच्या काळात सुट्टीचे १५ - २० दिवस निघून जाऊन पुन्हा आपल्या मित्रांचे आणि मैत्रिणींची आठवण यायला सुरवात होणारा काळ !

आजही त्या आठवणी ताज्या आहेत आणि असतात पण काळाच्या ओघात आणि धकाधकीच्या आयुष्यात विसराला होणाऱ्या आठवणी जणू ताज्या होतात ते केवळ ह्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे !

अगदी १९७५ पासूनच्या सुनील गोगटे पासून सर्व दरवर्षी होणाऱ्या वर्षातील दोन भेटींना येत राहिले आणि आता फेसबुक ग्रुपवर तर शैलेश कामत ( १९७८), प्रसाद जोशी ( १९९०) आणि मंदार पाटणकर (१९८८) आदींनी जगभरातून " फक्त वामुमावि च्या १९७५ पासूनच्या माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनीसाठी" ग्रुप साठी मित्र - मैत्रिणी जोडले.

विसरू नका ! १९७५ पासून दरवर्षी निदान ५० जण तरी संगणक जाणारे अथवा दरवर्षीच्या संख्येपैकी ३० जण तरी इंटरनेट शी जोडले असतील तेह्वा "१००१" सदस्य संख्या होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

अनेक जणही वैयक्तिकरित्या अनेक वर्गमित्रांना आणि वर्गमैत्रीणीना जोडत आहेत,जोडत राहतील अशी खात्री आहे.

तेव्हा आपण सर्वाना "अक्षय मैत्री" साठी शुभेच्छा !

Saturday, April 30, 2011

सांत्वन भेट


सांत्वन भेट

कै. दिगंबर भी. कुलकर्णी यांचे दिनांक २६ एप्रिल २०११, मुलुंड पूर्व येथे रोजी सकाळी निधन झाले.

शोकाकुल कुलकर्णी परिवारास भेट देऊन श्रीमती इंदिरा दि. कुलकर्णी (आय. डी. के. म्याडम), डॉ. उपेंद्र कुलकर्णी आणि कुलकर्णी परिवारचे सांत्वना साठी वर्ष १९८२ चे शालेय मित्र, १ मे २०११, रविवार रोजी सकाळी १०.१५ वाजता प्रसाद अपार्टमेंट, चाफेकर बंधू मार्ग ( नवघर - मिठाघर लिंक) मुलुंड पूर्व येथे जमतील.

आपण सर्वच शालेय मित्र - मैत्रिणी पैकी ज्यांना शक्य होईल त्यांना कळवण्याचे करावे.

Tuesday, April 26, 2011

दुखद: निधन : श्री. दिगंबर भी. कुलकर्णी


दु:खद निधन

कळविण्यास अत्यंत दु:ख होते कि, मुलुंड पूर्वमधील अग्रगण्य सामाजिक आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. दिगंबर भी. कुलकर्णी यांचे आज दिनांक २६ एप्रिल २०११, मुलुंड पूर्व येथे रोजी सकाळी निधन झाले.

कैलासवासी, श्री. दिगंबर भी. कुलकर्णी , हे वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयाच्या एक माजी मुख्याध्यापिका श्रीमती. इंदिरा कुलकर्णी ( आय. डि. के. म्याडम ) याचे पती, तसेच वर्ष १९८२ चा माजी विद्यार्थी, डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांचे वडील होते.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो

Tuesday, April 19, 2011

धूली वंदन भेट २०११ ची आणखी काही छायाचित्रे - सौजन्य - सुनील बोरकर - वर्ष १९८२



धूली वंदन भेट २०११ ची आणखी काही छायाचित्रे 

सौजन्य - सुनील बोरकर - वर्ष १९८२

Click the Link over here 


Monday, April 11, 2011

हार्दिक अभिनंदन !


हार्दिक अभिनंदन !
वा.  मु. मा. वि.  च्या  वर्ष १९८० मधील शाळकरी माजी विद्यार्थी, 
ख्यातनाम कला दिग्दर्शक 
श्री. नितीन चंद्रकांत देसाई 
यांचे 
आर्ट डिरेक्शन गिल्ड हॉलिवुडलॉस एंजल्स 
या संस्थेचे सदस्यत्व सन्मानाने आणि कर्तबगारीने मिळवल्याबद्दल विशेष हार्दिक अभिनंदन !

खालील लिंक क्लिक करा !

Friday, April 1, 2011

होळी - धूली वंदन - २० मार्च २०११ - छायाचित्रे

होळी - धूली वंदन - २० मार्च २०११ - छायाचित्रे 

सौजन्य : पराग ओंक ( वर्ष १९८२ )


फोटो ची लिंक खालील प्रमाणे, पाहण्यासाठी क्लिक करा येथे

Monday, March 21, 2011

Check the correction Regarding Reunion of AC YR 1977 - 78 ( 1978 Pass Out)

Dear All,

Please Check the correction Regarding Reunion  of  AC YR 1977 - 78 ( 1978 Pass Out)

2011/3/21 Vijay Kale 

Dear Ravi,

Sorry I was not able to join you on 20.03.2011 for HOLI.

While going thru' your mail, I read about message by Kiran Deshmukh.
Yes, we are arranging a re-union. Thanks for spreading the message.
However, there are some corrections in message by Kiran Deshmukh.

Original message is as under:
 
1. Batch of 1977-1978 (Passouts 1978)
2. Date of Reunion is 17.04.2011
3. Contact Details --> Kiran Deshmukh (9820184682)/ Vijay Kale (8108066249) 

Regards,

Vijay Kale (1978 batch)

NOTE: Please communicate this to all.

Sunday, March 20, 2011

इसवी. २०११ - वा. मु. मा. वि. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी - धूली वंदन वार्षिक भेट

इसवी. २०११ - वा. मु. मा. वि.
 माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी 
 धूली वंदन वार्षिक  भेट 

दिनांक २० मार्च २०११ रोजी सकाळी १० नंतर खालील 
माजी विद्यार्थी धूली वंदन वार्षिक भेट मध्ये सामील झाले.

१) श्री माधव कळमकर  वर्ष १९७६
२) श्री विश्वास फाटक     वर्ष १९७६
३) श्री निलेश धोपटकर वर्ष  १९८८
४) श्री मंदार पाटणकर वर्ष १९८८
५) श्री मनोज शांडिल्य वर्ष १९८०
६)  श्री आशिष शांडिल्य वर्ष १९८२
७) श्री योगेश वैशंपायन वर्ष १९८२
८) श्री सुनील बोरकर वर्ष १९८२
९) श्री पराग ओंक वर्ष १९८२
१०) श्री प्रसाद घरत  वर्ष १९८२
११) श्री अतुल कुलकर्णी  वर्ष  १९८२
१२) श्री रविंद्र गांगल  वर्ष १९८२
१३) श्री सारंग दाणी वर्ष १९८२ 
१४) श्री संदीप दौंड  वर्ष १९७८
१५) श्री मनोज दौंड वर्ष १९८१


सर्वांनी एकमेकांना रंग लावल्या वर शालेय जीवनाबद्दल आणि शाळकरी मित्र - मैत्रिणीबद्दल गप्पा मारल्या.

वर्ष १९७७ च्या  वा. मु. मा. वि. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी  पुनर्भेट कार्यक्रम दिनांक १४ एप्रिल २०११ रोजी शारदा नीलायम परिसरात होणार आहे असे श्री किरण देशमुख यांनी कळवले होते.

आपणास परिचित १९७७ च्या माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनीना 
श्री किरण देशमुख यांचेशी १० एप्रिल २०११ पूर्वी  
संपर्क साधण्यास कळवावे हि विनंती !


वर्ष १९८८ च्या माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी प्रस्तावित पुनर्भेट कार्यक्रमासाठी संपर्क अभियान श्री मंदार पाटणकर, श्री निलेश धोपटकर, श्री महेश केंदुरकर आदींनी सुरु केले आहे. 

आपणास परिचित १९८८  च्या माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनीना श्री मंदार पाटणकर, श्री निलेश धोपटकर, श्री महेश केंदुरकर आदींशी  यांचेशी संपर्क साधण्यास कळवावे हि विनंती !


गेली पाच वर्ष माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी वर्षातून दोनदा एकमेकांना भेटत असतात त्या निम्मिताने सर्व जुन्या शाळकरी मित्रांची माहिती आणि पुनः ओळख होते. अश्या वेळेस काही रचनात्मक उपक्रम राबवावा असा  विचार मांडला गेला आहे. तेह्वा सद्य स्थित विविध उपक्रम करणाऱ्या संस्था मुलुंड मध्ये आहेत त्या व्यतिरिक्त 

वेगळे काय करता येईल हे सुचवावे  अशी सर्वाना विनंती.

सायकल फेरी, वृक्षरोपण, विविध संस्थाची, उपक्रमांची आणि विविध ठिकाणी मिळू शकणाऱ्या सोयी - सवलतीची माहिती देणे - घेणे अश्या काही सूचना आल्या आहेत तेह्वा आपले मत, सूचना, विचार आणि आपल्या सहभागाची तयारी  इ - मेल द्वारे कळवावी म्हणजे पुढील वार्षिक भेट दिनांक २६ जानेवारी २०१२ रोजी मूर्त स्वरूपात साकारता येईल.

पुढील वर्षी कार्यक्रम जोरदार आणि पूर्वीच्या माजी विद्यार्थी संघ सारखा करावा असे ठरले.

शाळेच्या व्यवस्थापन समितीत सध्या ११ पैकी ९ सदस्य माजी विद्यार्थी आहेत तेह्वा सर्व ती मदत घेता व देता येईल.

टीप: वर्ष १९७५ पासूनच्या आता पर्यंत सर्व वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थिनीच्या भेटी, समूह सभा, सहली, पाल्यांची वा माजी विद्यार्थ्यांच्या / विद्यार्थिनीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक यश, समूह छाया चित्रे, तसेच क्षेम - कुशल आपण कळविल्यास आपल्या  ब्लॉग वर वा फेसबुक ग्रुप वर  देता येईल.
दरवर्षी २६ जानेवारी आणि होळी च्या दुसरे दिवशी सर्वच वर्षीचे म्हणजे १९७५ पासूनचे हौशी माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी नवीन शाळा संकुल परिसरात आणि संभाजी पार्क परिसरात  एकत्र येतात हे विसरू नये !

 इसवी. २०११ - वा. मु. मा. वि. माजी विद्यार्थी / माजी विद्यार्थिनी - धूली वंदन भेट  कार्यक्रमाची छाया - चित्रे  लवकरच देण्याचा प्रयन्त करण्यात येईल.