माझ्या वा. मु. मा. वि. शाळेच्या १९७५ पासूनच्या विविध वर्षांच्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनीनो!
आपण दरवर्षी २६ जानेवारी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्यासाठी जमत असतो. आणि गेली पाच वर्षे विविध वर्षातील माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थीनी याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
सकाळी ९ .३० नंतर शालेय परिसरातील महाविद्यालय, जिमखाना परिसराची ओळख करून घेऊन, मागील बाजूस म्हणजे शालेय व्यायाम कक्षा मागे / अल्पोपहार केंद्राच्या मागील बाजूस एकत्र जमलो. एकमेकाची ओळख, शाळेच्या विद्यमान कार्यकारणीच्या सभासद ( माजी विद्यार्थ्यांपैकी ) यांचे मनोगत - अनुभव - अपेक्षा यांचा समन्वय साधला.
उपस्थित शालेय मित्र
१) सुनील गोगटे १९७५
२) गिरीश करमरकर १९७५
३) रवींद्र भोसले १९७६
४ ) विकास कुलकर्णी १९७६
५ ) शिरीष गोखले १९७८
६) आशुतोष साळवेकर १९७८
7 ) किरण देशमुख १९७८
७ ) संदीप दौंड १९७९
८ ) मिलिंद काळे १९८०
९ ) राजन ताम्हाणे १९८१
१० ) पराग ओंक १९८२
११) सुनील बोरकर १९८२
१२) विकास गुप्ते १९८२
१३ ) जगदीश महाजन १९८२
१४ ) रविंद्र गांगल १९८२
१५ ) हेमंत देवस्थळी १९८३
१६ ) संतोष ताम्हाणे १९८४
१७ ) निलेश धोपटकर १९८६
एकीकडे एकमेकांशी ओळख करून घेत अल्पोपहार - चहा पण झाले.
अल्पोपहार आणि चहापान यांची व्यवस्था श्री किरण देशमुख / श्री आशुतोष साळवेकर यांनी संस्थे मार्फत श्री जोशी - शालेय अल्पोपहारगृहातून केली खालील बाबी वर सगळ्यांचे एकमत झाले
१) सर्वच माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी यांनी दरवर्षी आपआपल्या परीने २६ जानेवारी रोजी शारदा नीलायम येथे सकाळी ९ वाजता आणि होळी च्या दुसऱ्या दिवशी संभाजी पार्क च्या चौकात - एम. गि. एल. ऑफिस समोर सकाळी ९.३० वाजता जमणे.
२) २०१२ मध्ये तीन - चार महिन्यात शाळेच्या सभागृहात अथवा अन्य ठिकाणी एकत्र सर्व वर्षाच्या माजी विद्यार्थी - माजी विद्यार्थिनी साठी एक पूर्ण वेळचा स्नेह मेळावा - भेट आयोजित करणे.
प्रजासत्ताक भेटी आधी अथवा नंतर, श्री रवी परांजपे १९७५, श्री मनोज कार्लेकर १९८१ आणि श्री दीपक करकरे १९८२ यांची बऱ्याच जण्यांशी भेट झाली.
टीप : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या भेटी निम्मिताने जमणे झाले पण आता फेसबुक ग्रुप माध्यमातून बरेच जन संपर्कात असल्याने कुठल्या प्रकारची नोंद वही / संपर्क पत्ते घेणे झाले नाही तरी उपस्थितांच्या नावामध्ये काही फेर बदल करायचा असल्यास वा नाव राहून गेले असल्यास कळवणे.
ह्या भेटी दरम्यान कुठलेही फोटो काढण्यात आले नाहीत - क्षमस्व:
पुढील एकत्र भेट ८ मार्च २०१२ गुरवार रोजी सकाळी संभाजी पार्क च्या चौकात - एम. गि. एल. ऑफिस समोर सकाळी ९.३० वाजता जमणे.
1 comment:
Minor corrections.
16) Girish Tamane (1986)
17) Neelesh Dhopatkar (1988)
Post a Comment